अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Abdu Rozik Engagement l छोट्या पडद्यावरील बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये प्रत्येक वेळी काही आंतरराष्ट्रीय स्टार स्पर्धक म्हणून येतात. अब्दु रोजिकने बिग बॉस 16 मध्ये प्रवेश केला आणि शोमध्ये वर्चस्व गाजवले. यानंतर भारतात सर्वजण त्याला ओळखू लागले. शो दरम्यान, तो नेहमी प्रेम आणि एकटेपणाबद्दल बोलत असे कारण त्याची उंची 3 फूट आहे, पण अब्दू रोजिक आता आनंदी आहे कारण आता तो लग्नबंधनात अडकणार आहे.

अब्दूने चाहत्यांना दिली गुडन्यूज :

अब्दू रोजिकने 9 मे रोजी इंस्टाग्रामवर जाहीर केले होते की तो 7 जुलै रोजी लग्न करत आहे. पण 10 मे रोजी त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु रोजिक आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे.

10 मे रोजी अब्दू रोजिकने त्याच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. फोटोंमध्ये अब्दू एका मुलीला अंगठी घालताना दिसत आहे. हे शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अलहमदुलिल्लाह 24.04.2024’ याचा अर्थ अब्दू रोजिकने 24 एप्रिल 2024 रोजी अमीरासोबत लग्न केले आहे. अब्दू आणि अमिराची एंगेजमेंट दुबईत झाली असून त्यांचे लग्नही तिथेच होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या फोटोंमध्ये अब्दू त्याच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचवेळी त्याचे फॉलोअर्स आणि सेलिब्रिटी मित्र त्यांचे अभिनंदन करत आहेत.

Abdu Rozik Engagement l अब्दु रोझिकचे लग्न कधी आहे? :

अब्दू रोजिकने 9 मे रोजी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की त्याला त्याच्या स्वप्नातील मुलगी सापडली आहे. त्याने व्हिडिओमध्ये सांगितले होते की, मुलगी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तोही तिच्यावर प्रेम करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्दू रोजिक आणि अमीरा 7 जुलै रोजी यूएईमध्ये लग्न करणार आहेत. अब्दू रोजिकची फॅन फॉलोअर्स फक्त यूएईमध्येच नाही तर भारतातही त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या लग्नाच्या बातमीने सगळेच खूश आहेत.

News Title – Abdu Rozik Engagement Photos

महत्त्वाच्या बातम्या

माझे मोदी सरकारबद्दल मतभेद राहणार! पण तरीदेखील महायुतीला मतदान करा; राज ठाकरे

शनीच्या कृपेने 24 तासांत हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; धो-धो पाऊस बरसणार

ब्रिजभूषण सिंह यांना झटका; लैंगिक शोषणप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय

वेबसीरीज पाहून केलं असं काही की संपूर्ण देश हादरला; 15 वर्षांच्या मुलाला…