अब्दूला लग्नापेक्षाही ती गोष्ट फार महत्वाची; अब्दू रोजिकने लग्न पुढे ढकलण्यामागे हे आहे कारण

Abdu Rozik Wedding l जेव्हापासून सोशल मीडिया सेन्सेशन आणि प्रसिद्ध गायक अब्दू रोजिकने त्याच्या लग्नाची घोषणा केली तेव्हापासून प्रत्येकजण लग्नाची वाट पाहत आहे. मात्र आता अब्दूच्या चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण अब्दूने त्याच्या लग्नाची तारीख पुन्हा एकदा बदलली आहे.

अब्दूने या कारणामुळे विवाह सोहळा पुढे ढकलला :

अब्दूचा विवाह ७ जुलैला होणार होता पण आता एका खास कारणामुळे तो काही काळ पुढे ढकलल्याची बातमी समोर येत आहे. कारण अब्दूला त्याच्या पहिल्या बॉक्सिंग लढतीची ऑफर देण्यात आली आहे जी 6 जुलै रोजी दुबईतील कोका कोला एरिना येथे होणार आहे. यासंदर्भात अब्दू म्हणाला की, मला आयुष्यात या विजेतेपदासाठी बॉक्सिंग फाईट करण्याची संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते

. या वर्षात माझ्या करिअर आणि लव्ह लाईफमध्ये अनेक बदल झाले आहेत. पण सध्या मला माझे लग्न पुढे ढकलावे लागेल. कारण या सामन्यामुळे मला भविष्यात खूप चांगली आर्थिक सुरक्षा मिळेल. अब्दूने सांगितले की, त्याची पत्नी अमीरा देखील या प्रकरणात त्याला साथ देत आहे. “अमिरा माझ्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करते, कारण यानंतर आम्हा दोघांसाठी खूप काही बदलेल, त्यामुळे त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Abdu Rozik Wedding l इतर लोकांना प्रेरणा द्या :

अब्दूने सध्या तरी लग्नाची दुसरी तारीख ठरवलेली नाही. मात्र अब्दूने त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की, तो सामना संपल्यानंतर लवकरच लग्नाची दुसरी तारीख जाहीर करणार आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये इतिहास रचण्यासाठी त्याला सध्या पूर्णपणे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे अब्दूने सांगितले आहे. तसेच अब्दू हा डब्ल्यूबीसी आणि आयबीएचा राजदूत आहे, त्यामुळे इतर दिव्यांगांनाही त्याच्या खेळापासून प्रेरणा मिळावी अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे इर्तनी देखील यातून प्रेरणा घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे.

ताजिकिस्तान येथील प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने गायलेली ‘चकी चकी बोरॉन’, ‘ओही दिली जोर’ आणि ‘मोदर’ही गाणी प्रचंड प्रसिद्ध आहेत. मात्र, ‘बिग बॉस 16’मध्ये आल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे ताजिकिस्तान सोबतच भारतात देखील त्याचे फॅन फॉलोईंग खूप वाढले आहेत.

News Title : Abdu Rozik Wedding postpones

महत्त्वाच्या बातम्या- 

पैसे तयार ठेवा, या भन्नाट फीचर्ससह इलेक्ट्रिक कार लाँच होणार

महायुतीत असलो तरी शरद पवारांची विचारधारा सोडणार नाही; अजितदादा भावूक

राज्यातील विद्यार्थ्यांचा गणवेश ठरला! असा असणार शालेय गणवेश; वाचा संपूर्ण नियमावली

धो-धो पाऊस कोसळणार; राज्यातील या जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट जारी

या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होणार