बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे (MVA) माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिवसंवाद यात्रेचा आरंभ केला आहे. सध्या ते औरंगाबाद शहरात आहेत. त्यात त्यांनी अनेक वेळा बंडखोर आमदारांना गद्दार म्हटले आहे. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे देऊन पुन्हा निवडणूका लढवून दाखवा, असे त्यांनी आव्हान देखील केले आहे.

त्यावर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तार म्हणाले, मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला तयार आहे. फक्त एकनाथ शिंदे यांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि कोण निष्ठावंत? माझी मातोश्रीवर जाण्याची इच्छा नाही. मी आदित्य ठाकरेंना विनंती करतो की, त्यांनी माझ्या मतदार संघात यावे. यापूर्वी आला नव्हता, पण आता या, असे देखील सत्तार म्हणाले.

सर्व काही ठीक सुरु असताना, त्यांनी गद्दारी का केली? हे अद्याप मला कळू शकलेले नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच हे बेकायदेशीर सरकार कोसळणार आहे. हे सर्व होत असताना विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमच्यासोबत 15 आमदार बसले होते. आम्ही समोर बसलेले 15 जण स्वाभिमानाने त्यांच्याकडे पहात होतो. पण ते आमच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. त्यांचे मुखवटे फाटून गेले आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी आदित्य ठाकरे यात्रेदरम्यान कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी नुकतेच नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांचे दौरेे पूर्ण केले आहेत. शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील दौरे करणार आहेत. ते नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. 30 आणि 31 जुलै रोजी शिंदे या दोन शहरांत जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये’, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम

‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्षाची कथा

रणवीरचा ट्रेंड साऊथमध्येही, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट

जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा निर्णय, मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More