मुंंबई | राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका घरात सत्तार एका व्यक्तिला शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे.
मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारल्यामुळे सत्तार शिवीगाळ करत असल्याचा संबंधित कार्यकर्त्याने आरोप केला आहे. मात्र सत्तार यांनी शिवीगाळ करत असल्याचा आरोप फेटाळला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ माझा आहे का?, का माझा व्हिडीओ कोणी बनवून दिला आहे. मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे त्यामुळे सरकारने याबाबत चौकशी केली पाहिजे, असं अब्दुल सत्तार यांन म्हटलं आहे.
कुठे गेले मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक?आता आवाज येऊ द्या की भावांनो…आता ज्या गोठयात उभे आहात तिथे तुम्हाला वेसणच अशी घातली आहे की तुमच्या तोंडून शब्दही फुटणार नाही…pic.twitter.com/ljYXQLo1hF
— पाटीलकी™ (@patil_speaks23) October 5, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दाव
‘अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर’; भाजप आमदाराची जहरी टीका
देश कसा चालवतात हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही- राहुल गांधी
“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?”