पुणे | सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. याला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी भाजपला लगावला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. भाजप नेत्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी करण्यात आली आहे, असं सांगत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द केली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एस्कॉर्ट शिवाय सुरक्षा देण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची झेडप्लस सुरक्षा काढून त्यांना एस्कॉर्टसह वायप्लस, एम. एल. टाहिलीयानी यांची झेड सुरक्षा काढून वाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. जी. ए. सानप यांचीही झेड सुरक्षा काढून वाय सुरक्षा देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
“पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो”
“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”
मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस
“महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता खुपत आहे”
नाशिकमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश