“…तर महाराष्ट्राची जनता काय आदर्श घेणार?, विरोधकांनी विचार करायला हवा”
औरंगाबाद | विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सर्व आमदारांनी कोरोनाच्या संकटात जे कायदे आणि नियम बनवले त्यांचं आमदाराच पालन करत नसतील तर लोकांमध्ये काय संदेश जाईल. विरोधी पक्ष जागेवर उभे राहून देखील विरोध करू शकत होते. मात्र समोर येऊन गोंधळ घालणे त्यासोबत तोंडावरचा मास्क काढणं आणि एकमेकांच्या समोर येऊन घोषणा देणं हे चुकीचं असल्याचं म्हणत राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
विरोध करताना शासनाच्या नियमांचं देखील पालन करायला हवं. कायदे मंडळात आपण आहोत आपणच कायदे मोडले तर महाराष्ट्राची जनता काय आदर्श घेणार?, याचा विचार विरोधकांनी करायला हवा, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.
राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन चालू आहे. यामध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्पोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. यावरून सभागृहात विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. यामध्ये सचिन वांझे या पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे. विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी सचिन वांझे यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत का?, त्यांना अद्याप अटक का झालेली नाही, असा सवाल केला आहे.
दरम्यान, अधिवेशनात आजही19 आमदार हे कोरोनाग्रस्त आहे. अशा परिस्थितीत गोंधळ घालणं, जे काही विरोधी पक्षाच्या माध्यमातून घडलं ते काही लोकशाहीला धरून नाही. विरोध करताना शासनाच्या नियमांचे देखील पालन करायला हवं असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला- देवेंद्र फडणवीस
पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण
…म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिल्या ‘अमित शहा खुनी है’ अशा घोषणा!
संतापजनक! मुख्यध्यापकानेच केला दहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार
मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा देवेंद्र फडणवीस कशी करू शकतात – अनिल देशमुख
Comments are closed.