मुंबई | ठाकरे सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. मात्र, प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना सरकारने केलेली कर्जमाफी बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा खोचक सल्ला राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारनं केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणं असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरुन सत्तार यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला.
मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या 80 टक्के शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे लाभ होणार आहे. तसेच ही कर्जमाफी नसून हा पहिला टप्पा आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
दरम्यान, सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे ते अगणित आहे. ते शब्दात किंवा अंकात सांगता येणार नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीविषयी भाष्य केलं होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस
पंकजा मुंडे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष?, तर चंद्रकांत पाटलांना ‘हे’ पद मिळणार?
महत्वाच्या बातम्या–
संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी
शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकाकडून गडबडी?
इंटरनेट हा मूलभूत अधिकार नाही- रविशंकर प्रसाद
Comments are closed.