बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजींची बोली अन् बंदुकीची गोळी एकसारखीच, त्यांचा आदेश आला की…”

मुंबई | देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून निवडणुकासाठी ताकद लावली जात आहे. त्यातच आता देगलूर बिलोली येथे प्रचारासाठी गेले असता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर निशाणा साधताना देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसैनिक विरोधकांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं आहे. अब्दुल सत्तार देगलूर बिलोली येथे प्रचारासाठी गेले आहेत. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच आहे, त्यांचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

देगलूर बिलोली येथील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यामुळे त्याठिकाणी आता पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. देगलुर बिलोली या विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपने शिवसेनेतील नाराज आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. सुभाष साबणे काही दिवसांपूर्वी भाजपचा झेंडा हाती घेतला होता.

दरम्यान, देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष आपली ताकद लावताना दिसत आहेत. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“पवार घराण्याला महाराष्ट्र लुटायचा काय ठेका दिलाय का?”

…म्हणून रवी शास्त्रींपाठोपाठ ‘हा’ दिग्गजही संघाला जातोय सोडून, वाचा कारण!

“कालच्या निकालाचा आणि आजच्या छाप्याचा काही संबंध आहे का?”

गुंतवणूकदार मालामाल! अवघ्या काही मिनिटांत ‘हे’ दोन शेअर्स उसळले

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या! पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नवज्योत सिंग सिद्धू 1000 गाड्यांच्या ताफ्यासह लखीमपूरला रवाना; युपीत तणावाचं वातावरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More