जालना| रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय मी डोक्यावर केसही उगवू देणार नाही, असं म्हणणारे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार आता बदलेल्या परिस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्याच उपस्थितीत भाजप प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता, रावसाहेब दानवे मला कंगवाही देतील आणि भांगही पाडून देतील, असं म्हणत सत्तारांनी वेळ मारून नेली.
काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दहा आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपात जाणारे ‘ते’ 10 आमदार कोण याची चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-संरक्षणमंत्रीपद स्वीकारल्यावर राजनाथ सिंह चालले सियाचिन दौऱ्यावर
-‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय’; गोपिनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
रोजगारनिर्मितीची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही; शपथविधी संपताच शिवसेनेने टोचले भाजपचे कान
-“महाराष्ट्रात पडलेला हा दुष्काळ कदाचित शेवटचा असेल”
-शपथविधीच्या दिवशीच नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!
Comments are closed.