धुळे महाराष्ट्र

शासनाच्या सूचनांप्रमाणेच गणेशोत्सव, मोहरम साजरा करणार- अब्दुल सत्तार

धुळे | कोरोना विषाणूचे संकट पाहता गणेशोत्सव आणि मोहरमचा सण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थित सर्वधर्मीय बांधवांनी आज बैठकीत दिली. दरम्यान, नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज दुपारी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

पालकमंत्री सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे. तसेच गणेशोत्सव, मोहरमच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणावी. उत्सवाच्या कालावधीत वीज पुरवठा अखंडपणे सुरू राहील याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असली, तरी संकट टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या कालावधीत आलेल्या प्रत्येक सण, उत्सवाच्या वेळी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले आहे. गणेशोत्सव व मोहरमच्या कालावधीत नागरिक सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, नागरिकांना दिलासा!

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंची मुंबईत बदली

ग्रेटा थनबर्गने JEE आणि NEET परीक्षा स्थगित करण्यास दिले समर्थन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या