धुळे महाराष्ट्र

“चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष”

धुळे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं गणित कच्चं आहे, असा टोला मंत्री अब्दूल सत्तार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

ग्रामापंचायत निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या असून भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अब्दूल सत्तार यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

भाजकडून खोटी आकडेवारी सांगितली जात आहे. राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा शेवटून एक नंबर आलेला पक्ष आहे, अशी टीका अब्दूल सत्तार यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपने 6 हजार जागा जिंकल्याचा दावा केला होता. तर काँग्रेसनेही 4 हजार जागा जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे आमचाच पक्ष राज्यात एक नंबर राहिल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत

“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा”

कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण!

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या