बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी दिला तर…”

मुंबई | औरंगाबादमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना- भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. अशात शिवसेना मंत्र्यांने केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र यावेत यासाठी आपण मध्यस्ती करणार का, असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. यावर मी मध्यस्थी करण्याइतका मोठा नाही. मात्र, मध्यस्थी करण्याची वेळ आली तर मध्यस्ती करू शकतो, असं सत्तार म्हणाले.

माझं वैयक्तिक मत असं आहे की, सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शब्द द्यायला हवा. पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असा शब्द पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा असा शब्द त्यांनी दिला पाहिजे. तसं झालं तर दोन पक्ष नक्कीच एकत्र येतील, असंही अब्दुल सत्तार म्हणालेत.

दरम्यान, औरंगाबादेतील कार्यक्रमात भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी, असं म्हटलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता!

‘वयाची 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’; अजित पवारांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला टोला

‘या’ ठिकाणी ट्रक चालकांना मिळतो तब्बल 70 लाख पगार!

‘अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता, कट्टरतावाद कायम राहिला तर…’;, नरेंद्र मोदींनी तालिबानचे सांगितले धोके

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More