महाराष्ट्र रत्नागिरी

“भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

रत्नागिरी | भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात, असा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. मात्र हे पुढे येऊन बोलायला भाजपचे नेते घाबरतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपच्या नेत्यांकडून पाठीमागून का होईना, कौतुक होतंय हे अभिमानास्पद आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. विखे पाटील विरोधी पक्ष नेते असताना राज्य आणि केंद्राची तुलना करताना केंद्राकडे बोट दाखवायचे, त्यामुळे अजून विखेंचे बोट तिकडे आहे की विखे पाटील तिकडे आहेत?, असा सवाल सत्तार यांनी उपस्थित केला.

निधी देण्यासाठी आम्ही केंद्राकडे बोट दाखवतो, केंद्राने आमच्या हक्काचे पैसे द्यावे. आम्ही हक्काच्या पैशांसाठी बोट दाखवतो पण बिहारच्या निवडणुकीत कोरोनाच्या लसीचं राजकारण भाजपने केलं. ही कुठली नीतीमत्ता?, असा सवाल अब्दुल सत्तार यांनी भाजपला विचारला.

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार- वर्षा गायकवा

“एक वेळ अशी येईल की मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

“शरद पवारांकडे ‘हर मर्ज की दवा’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला”

जो बायडन यांनी फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसात घेतली सभा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या