जालना | बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता या प्रकरणावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्यार किया तो डरना क्या…, असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे, असं सत्तार म्हणाले.
भाजपच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती लपवली होती. अशा नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर नियमाप्रमाणं धनंजय मुंडे यांना शिक्षा व्हावी’; चित्रा वाघ आक्रमक
अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!
कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- जयंत पाटील
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ?; ‘या’ नेत्याने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले…