धुळे महाराष्ट्र

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

धुळे | जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं वक्तव्य राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी बोलताना सत्तार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असं सत्तर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू- शोएब अख्तर

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर

ब्रिटनहून परतलेली बेपत्ता कोरोनाबाधित महिला आंध्रात सापडली!

नाईट कर्फ्यूवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या