महाराष्ट्र रत्नागिरी

“शरद पवारांकडे ‘हर मर्ज की दवा’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला”

रत्नागिरी | शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

दरम्यान, भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचे कौतुक करतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. मात्र हे पुढे येऊन बोलायला भाजपचे नेते घाबरतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाजपच्या नेत्यांकडून पाठीमागून का होईना, कौतुक होतंय हे अभिमानास्पद आहे, असंही सत्तार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा”

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?- विजय वडेट्टीवार

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील”

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या