Top News धुळे महाराष्ट्र

“भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात”

धुळे | भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत असतात असं राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

भाजपचं राजकारण म्हणजे मुँह में राम बगल में छुरी, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे. धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते.

जोपर्यंत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नसल्याचं सत्तारांनी म्हटलं आहे. भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात, या वक्तव्यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी सत्तारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, भाजपच्या कोणत्याही नेत्याने असं कधीही वक्तव्य केलं नाही. खासगीतही कोणी बोलत नाही. ही सत्तारांची बोलाची कढी आणि बोलाचाच भात असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेच्या खासदाराने केली ‘या’ दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री बदलण्याची मागणी

फडणवीसांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद पण…- संजय राऊत

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण

देवेंद्र फडणवीसांचा 23 वर्षापुर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड अखेर ही तरूणी तोडणार

‘तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार’; भातखळकरांची जहरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या