Top News महाराष्ट्र

नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार

मुंबई | राज्य सरकारने राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. तर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली. यावरून भाजप नेते नितेश राणेंनी निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. यावर सत्तारांनी राणेंना टोला लगावला आहे.

नितेश राणे हे पहिले हँग आहेत. चाराण्यासारख्या गोष्टी करणाऱ्यांनी अशाप्रकारे बोलावं याचं मला आश्चर्य वाटतंय. कोणाला सुरक्षा द्यावी कोणाला नाही द्यावी हे शासन ठरवेल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगणा राणावतला सुरक्षेची किती गरज होती?, हे केंद्राला विचारलं पाहिजे. कंगणाला महाराष्ट्रातील मंत्र्यापेक्षाही नाही अशी सुरक्षा दिली होती. रक्षेची कुणाला आणि किती आवश्यकता आहे? याचा रिपोर्ट प्रशासन देते, त्यामुसार सुरक्षा दिली जात असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

  वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवी

थोरली CA तर धाकटी युपाएससी उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?

तानाजी चित्रपटाला एक वर्ष पुर्ण! शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद- शरद केळकर

लसीच्या सुरक्षेबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी- राष्ट्रवादी

‘आज मला पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटलं’; भारतीय संघातील ‘या’ शिलेदाराची प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या