औरंगाबाद | राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालं नाही. मात्र महाविकास आघाडीने भाजपचे बालेकिल्ले मिळवत चार जागांवर विजय नोंदवला. याच पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करु असं सत्तार यांनी म्हटलं आहे. औरंगाबादध्ये ते बोलत होते.
कोल्हापूरच्या पाटलांनी विधानसभा निवडणूक पुण्यातूल लढवली होती. या मुद्याला धरत विरोधकांनी त्यांच्यावर वारंवार निशाणा साधला. त्यावेळी पाटील प्रत्युत्तर देताना म्हणाले होते की, मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन.
दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले होते की, भाजपला राज्यात एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. यावर सत्तार त्यांना म्हणाले, सत्तास्थापनेची स्वप्नं पाहू नयेत. त्यांचं स्वप्न खरं होणार आहे. पण ते 32 तारखेला, आणि 32 तारीख येणार असेल तर त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुण्यात सासऱ्यानेच दिली सुनेची सुपारी पण झालं असं की…
दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र
कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचंच, त्यांनी आंदोलन थांबवावं- रक्षा खडसे
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर
“महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही तर थेट कृती करणार”