“मुस्लिमांसाठी भारत राहण्यायोग्य देश नाही, माझ्या मुलांना मी…”

मुंबई | मुस्लिमांसाठी भारत (India) राहण्यायोग्य देश नाही, असं वक्तव्य राजद नेते अब्दुल बारी सिद्दकी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.

सिद्दकी यांनी आपल्या मुलांचं शिक्षण परदेशात झालं असून आपण त्यांना तिकडेच स्थायिक होण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं.

मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सध्या हार्डवर्डमध्ये शिक्षण घेत आहे. मुलगी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून उत्तीर्ण झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशातील वातावरण सध्या असं आहे की मी माझ्या मुलांना सांगितलं आहे की तिकडेच नोकरी करा. नागरिकत्व मिळालं तरी घेऊन टाका, असं त्यांनी मुलांना सांगितल्याचं म्हटलंय.

भारतातील सध्याची परिस्थिती तुम्ही सहन करु शकणार नाही. तुम्ही विचार करु शकता की एखादे आई-वडील किती त्रास सहन करुन आपल्या मुलांना हे सांगत आहेत की आपली मातृभूमी सोडा, असंही सिद्दकी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महत्त्वाच्या बातम्या-