अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार

औरंगाबाद |  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सदस्यत्वासह औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सुभाष झांबडांना उमेदवारी मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज झालेले आहेत. त्यांनी औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय.

औरंगाबाद काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

एकीकडे सेना भाजप युतीने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून सुभाष झांबडांना उभे ठाकले आहेत.  अब्दुल सत्तारांच्या अपक्ष लढण्याने औरंगाबादमध्ये तिरंगी लढत होईल.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही!

पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!

शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…

महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट!

नाराज झालेले जानकर म्हणतात, पक्षातले लोक सोडून गेले तरी रासप पक्ष वाढत राहील