बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाला रोखण्यासाठी ‘या’ आमदाराने शहरातील गल्ल्यांमध्ये फिरवला होमयज्ञ!

बेळगाव | भाजप आमदार अभय पाटील यांनी कोरोनाला रोखण्यासाठी होमहवन केलं आहे. पर्यावरणाला विषाणूमुक्त करण्यासाठी त्यांनी हा यज्ञ केला. तसेच त्यांनी बेळगाव शहरातील गल्ल्यांमध्ये हा होमयज्ञ फिरवला.

होम हवन करण्याच्या उपक्रमाला आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीत शहापूर भागातील होसुरमध्ये प्रारंभ करण्यात आला. यामुळे वातावरण शुद्धी होणार आहे. होमहवनसाठी एक गाडी तयार करण्यात आली असून, विशेष कुंड देखील तयार करण्यात आलेत. 15 जूनपर्यंत हा उपक्रम संपूर्ण बेळगाव दक्षिण मतदारसंघात गल्लोगल्ली राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली. शहापूर, वडगाव, खासबाग आणि अन्य भागात पुढील दिवसात हा वातावरण शुद्धीकरण करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

प्रत्येक भागातील युवक मंडळे आणि महिला मंडळांनी पुढाकार घेऊन होम हवन करून वातावरण शुद्धीकरण करण्याचा उपक्रम यशस्वी करावा. पूर्वी घरोघरी उद घालण्याची पद्धत होती. पण अलीकडे ती बंद पडली आहे. तरी जनतेने पूर्वीप्रमाणे आपल्या घरात उद घालण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी. यामुळे प्रदूषित वातावरणाचं शुद्धीकरण होण्यास मदत होईल, असं अभय पाटील म्हणालेत.

दरम्यान, यापूर्वी भाजप नेते गोपाल शर्मा कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले होते. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो, असं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे

‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल

कारागृहात जाताच ढसाढसा रडला पैलवान सुशीलकुमार, अशी गेली पहिली रात्र!

“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”

…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More