Loading...

माझी लोकप्रियता पाहून मला पाडण्यासाठी ठाकरेंनी पैसे वाटले- अभिजीत बिचुकले

मुंबई | माझी लोकप्रियता पाहून मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांना पैसे वाटावे लागले, असा गंभीर आरोप बिग बाॅस फेम आणि वरळीतील उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळीतून तब्बल 4 कोटींची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम मला हरवण्यासाठी वापरण्यात आली. त्यामुळे माझा पराभव निश्चित आहे, असं बिचुकले यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Loading...

मी वरळीतून उमेदवारी अर्ज भरला. मी मुंबईत आलो, मुंबईकरांनी मला भरभरुन प्रेम दिलं. लोकांची मला मिळणारी प्रसिद्धी पाहून मला पाडण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांनी पैसे वाटले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघातून युवा सेनाप्रमुख  आदित्य ठाकरे आणि अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिचुकले यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...