Loading...

“माध्यमं तुम्हाला मोदीविरोधी बोलण्यास भाग पाडतील”

नवी दिल्ली |  यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधानांनी विनोदाने मला सांगितलं की, माध्यमं तुम्हाला मोदीविरोधी बोलण्यास भाग पाडतील, असं अभिजीत बॅनर्जी यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींबरोबर अनेक गोष्टींवर चांगली चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बॅनर्जींनी माध्यमांशी बोलताना दिली. पंतप्रधानांनी बराच वेळ मला दिला, त्याबद्दल मला आनंद आहे आणि त्यबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, असं बॅनर्जी म्हणाले.

Loading...

प्रशासनाचा विचार ते कशा पद्धतीने करतात ते त्यांनी सांगितलं. नोकरशाही सुधारण्यासाठी ते काय प्रयत्न करतात हे मोदींनी सांगितल्याचं बॅनर्जी म्हणाले.

दरम्यान, अभिजीत बॅनर्जी यांच्याशी माझी सविस्तरपणे चर्चा झाली. लोकांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची त्यांची तळमळ स्पष्टपणे जाणवली. त्यांना मिळालेल्या यशाचा भारताला निश्चितच अभिमान आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

Loading...

साताऱ्यातील धक्कादायक प्रकार; बटन दाबलं घड्याळाचं मत गेलं कमळाला…!

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...