देश

प्रत्येक गरीबाच्या खात्यावर दरमहा हजार रुपये जमा करा!

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने गरीबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे प्रत्येक गरीबाच्या खात्यात सरकारनं आर्थिक मदत थेट जमा केली पाहिजे, अशी मागणी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

अभिजीत बॅनर्जी आणि त्यांची पत्नी इस्तर डफ्लो जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “प्रत्येक गरीबाच्या खात्यावर सरकारने दरमहा हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच पुढील काही महिने सातत्याने ही मदत केली पाहिजे.”

1991 सालापेक्षा मोठं आर्थिक संकट देशावर येऊ शकतं, अशी भीती अभिजीत बॅनर्जी यांनी नुकतीच व्यक्त केली होती. जीडीपीमध्ये जोरदार घसरण होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली होती. अशा परिस्थितीत सरकारनं गरीबांच्या हातात पैसा पोहोचवण्याचा विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, दोन्ही पती-पत्नीने ‘वन नेशन, वन राशन’ योजना सरकारने लागू करावी, अशी मागणी केली आहे. जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुणेकरांनो सावधान… पुण्यात आज सापडले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

महत्वाच्या बातम्या-

“विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेतला जाईल”

‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन

विमान प्रवाशांसाठी ‘अशा’ आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या