बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; बिचुकलेंनी सांगितलं गणित

मुंबई | बिग बॅास (Big boss) फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 100 आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी शरद पवारांकडे साकडं घातलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं शिवसेनेशी युती करून जसं महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्याप्रमाणे जर शक्य असेल तर महाराष्ट्रातील एक लढवय्या या नात्याने पवार साहेबांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर माझं काम एकदम सोपं होईल, असं ते म्हणालेत.

मागील राष्ट्रपतीनिवडणुकीवेळी मी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. मी निर्व्यवसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती असणारा व्यक्ती आहे, अस त्यांना सांंगितल होतं. पण त्यावेळी त्यांनी कोणीतरी कोविंद यांना उमेदवारी दिली होती. त्यांना बहुमतामुळे ते जमलं, असं ते म्हणालेत.

सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील आमदारांशी-खासदारांशी माझं बोलणं सुरु आहे. 100 नेत्याच्या सह्या मिळाल्यास नक्की अर्ज भरणार आहेत. पण जोपर्यंत अर्ज भरत नाही तोपर्यत गुपित ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

‘सदाभाऊंच्या जीवाला धोका आहे असं वाटत नाही पण..’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

“कैद्यांनाही मतदानाचा अधिकार मग आमच्या मलिकांना आणि देशमुखांना का नाही?”

नीरज चोप्राचा सोनेरी विजय, केला आणखी एक अप्रतिम पराक्रम

Monsoon Update| राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

एकनाथ खडसे आणि राम शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More