पुण्यानं सातारला पाणी पाजलं, अभिजित कटके महाराष्ट्र केसरी!

पुणे | भूगावमध्ये रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या अभिजित कटकेने बाजी मारली. सातारच्या किरण भगतवर मात करत त्यानं 2017चा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत किरण भगतने आघाडी घेतली होती. मात्र अभिजितने सलग गुण कमावत 10-7 असा विजय मिळवला.

विजयी पैलवान अभिजित कटकेला चांदीची गदा आणि महिंद्रा थर गाडी देऊन गौरवण्यात आलं. ही लढत पाहण्यासाठी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेेते राधाकृष्ण विखे पाटील, रामराजे निंबाळकर, गिरीश बापट आदी नेतेमंडळी उपस्थित होते.