Abhijeet Kelkar | भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesha Phogat) हिने पॅरिस ऑलम्पिकच्या (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे भारताच्या सुवर्ण पदाच्या आशा उंचावल्या आहेत. विनेशच्या या कामगिरीनंतर तिचं देशभरातून कौतुक होत आहे. सिनेसृष्टीपासून ते राजकीय मंडळीपर्यंत सर्वच स्तरातून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशात काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) याने देखील विनेशसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
अभिजीतने त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत विनेशसाठी पोस्ट केली आहे. खरंतर तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही. तुझ्यातल्या स्त्रीशक्तीला साष्टांग दंडवत, अशी पोस्ट त्याने केली आहे. ही पोस्ट आता तूफान चर्चेत आली आहे.
अभिजीत केळकरची पोस्ट चर्चेत-
“आम्ही चुकलो…मानवनिर्मित देवदेवतांची पूजा करत राहिलो, तुझ्यातल्या स्त्रीत्वाला पायदळी तुडवलं, तुझ्यावर अत्याचार केले… पण तू हरली नाहीस. खरंतर तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही… तुझ्यातल्या स्त्रीशक्तीला साष्टांग दंडवत.”, अशी पोस्ट अभिजीतने (Abhijeet Kelkar) केली आहे. या पोस्टवर आता प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपच्या खासदार तथा अभिनेत्री कंगना राणौत (Kangana ranaut) यांनी देखील विनेशसाठी पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये मागे झालेल्या कुस्तीगीरांच्या आंदोलनावरून टोमणाही मारला आहे.“भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगाटने एकेकाळी कुस्तीगीरांच्या आंदोलनात भाग घेतला होता आणि तिथे तिने ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा दिल्या होत्या. तरीसुद्धा तिला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी, सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सोयीसुविधा देण्यात आल्या. लोकशाहीची आणि महान नेत्याचं हे सौंदर्य आहे.”, असं कंगना (Kangana ranaut) म्हणाली आहे. ही पोस्ट देखील तूफान व्हायरल झाली आहे.
विनेश फोगाटची अंतिम फेरीत धडक
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच विनेश फोगाटने दिल्लीत भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं.बृजभूषण सिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विनेश फोगाटसह काही कुस्तीपटूंनी केला होता.
याविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्तीपटू रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी विनेश फोगाटने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. हे आंदोलन तेव्हा खूप गाजलं होतं. अशात विनेशने ऑलम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. यामुळे देशभर सध्या विनेशची चर्चा आहे. (Abhijeet Kelkar)
News Title : Abhijeet Kelkar post on Vinesh Phogat
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला सर्वात मोठा धक्का; विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र
खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचाही मोठा दिलासा
पुढील काही दिवस राज्यात अशाप्रकारे असणार हवामान?
‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; कंगनाकडून विनेश फोगटला उपरोधिक शुभेच्छा
राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण