Abhijeet Sawant | ‘बिग बाॅस’ सिझन 5 मध्ये दुसऱ्या स्थानी असलेला अभिजित सावंत अलिकडच्या काळात चांगलाच चर्चेत राहिलेला आहे. सोशल मीडियावर अभिजीतची फॅन फाॅलोईंग दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे.
एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील अभिजीत सावंत सक्रिय असताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी अभिजीत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. दरम्यान अभिजीतचा एक नवा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
अभिजीत सावंतचा (Abhijeet Sawant) सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. अभिजीतने बाथरुममधील एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये अभिजीतने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि शिमरी शिवाय काळ्या रंगाचा कोट घातलेला असून डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगलही दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घालत आहे.
व्हायरल व्हिडीओ-
View this post on Instagram
नेहमी आपल्या आवाजाने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या अभिजीतने (Abhijeet Sawant) आज डान्सनेही सर्वांची मने जिंकली असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 3’ च्या महाअंतिम सोहळ्यात अभिजीत पाहायला मिळणार आहे. शनिवार 9 आणि रविवार 10 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतला रिॲलिटी शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अभिजीतने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्याने ‘जो जीता वही सुपरस्टार’ आणि ‘एशियन आयडॉल’ या शो मध्येही भाग घेतला होता.
News Title : abhijeet sawant bathroom video viral
महत्त्वाच्या बातम्या-
राजकारण ‘या’ भाजीसारखं झालं आहे… बड्या नेत्यानी सर्वच पक्षांना घेरलं!
महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश
ईडीची मोठी कारवाई! ‘या’ सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त
‘गरिबांना पक्क घर देणार’; अकोल्याच्या सभेत PM मोदींची घोषणा
“अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांना नोटीस पाठवली”; नव्या आरोपांनी खळबळ