“माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा म्हणजे सर्व प्रश्न सुटतील”

मुंबई | एमपीएससी (Mpsc) विद्यार्थ्यांचं जानेवारी महिन्यातही याच मागणीसाठी आंदोलन झालं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह फोनद्वारे चर्चा केल्यानंतर आणि आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र ते न पाळल्याने विद्यार्थी पुन्हा आंदोलनावर बसले.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आवाहन केलंय. आता या प्रकरणावर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी भाष्य केलं आहे. 

बिचुकले यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा सर्व प्रश्न लगेच सुटतील. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांचा सोडवणार, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला.

आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग म्हणतंय 2023 आणि विद्यार्थी म्हणतायत 2025. मात्र यामध्ये 2024 पासून नवा अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा, अशी मागणी बिचुकले यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-