“सगळ्यांना घरी बसवा आणि 2024 ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्यापासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांच्या याचा निर्णयही मेरिट नुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे पुढच्या 3 दिवसांच्या सुनावणीत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरेसं झालं, असं ते म्हणालेत.

आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदा घरीच बसवा, असं म्हणत त्यांनी सर्व राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून आला आहे. असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. तुम्ही 2024 मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, असं अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत अभिजीत बिचुकलेंनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीपासून ते पदवीधर आमदारापर्यंतच्या निवडणुकीत एकूण 8 ते 9 वेळा अर्ज केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-