बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय”

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली. यावरून पनवेलचे काँग्रेस नेते अभिजीत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केलीये. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे.

दि. बा. पाटील आणि नवी मुंबई विमानतळ याच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा काही एक संबंध नाही. नवी मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला काडीचे स्थान नाही. नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस ही दुसरी घाण सवय आहे, असा घणाघात अभिजीत पाटील यांनी केलाय.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंबेडकर या माणसाची काही एक पात्रता नाही. अजिबात स्वकर्तृत्व नसलेला हा तथाकथित नेता आयुष्यभर कुणाच्यातरी कुबड्यांवर राजकारणात उभा राहिला, असा आरोप अभिजीत पाटील यांनी केलाय.

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की दि. बा. पाटील यांचं, याच्याशी वास्तविक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सुतराम संबंध नाही. नवी मुंबईत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काडीचं स्थान नाही. इथल्या लोकभावना, इथल्या अस्मिता, इथले आर्थिक प्रश्न, याबाबत प्रकाश आंबेडकरांना चार परिच्छेदांचा निबंध कुणाशी चर्चा न करता लिहून दाखवला तर मी त्यांचा दास होईन, असं अभिजीत पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही”

भाजपला मोठा धक्का; एका खासदारासह तीन आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत???

‘मी 6 बाॅलवर 6 सिक्स मारले तेव्हा धोनी…’; तब्बल 13 वर्षानंतर युवराज सिंगचा खुलासा

3 जिल्ह्यात अतिवृष्टी तर कोकणातल्या या जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता, घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान!

“भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More