Abhishek Bachchan| बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असणारे अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबदल बोलंल जात होतं. ऐश्वर्या अभिषेकपासून दूर राहतेय असंही म्हटलं जात आहे. तर काही दिवसांपूर्वीच सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनी ऐश्वर्यावर आरोप केले होते. दरम्यान, आता सोशल मीडियावर अभिषेक बच्चनला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या सगळ्या गोष्टी घडत असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अभिषेक बच्चन, अभिनेत्री निम्रत कौर हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबदल जोरदार चर्चा सुरु आहेत.
View this post on Instagram
कोण आहे निम्रत?
निम्रत आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. एवढंच नाही तर, चर्चा रंगल्यानंतर निम्रतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘लंचबॉक्स’ सारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौर आहे.
पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्रामवर निम्रत कौरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान अभिषेक सोबत अफेअरची चर्चा रंगल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी अभिनेत्रीवर संताप व्यक्त केला आहे.
News Title : abhishek bachchan dates nirmit kaur
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादा गटाची यादी थोड्याच वेळात जाहीर; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण
लोकसभेतील जरांगे फॅक्टरमुळे भाजप सावध, विधानसभेला मोठी खेळी
बीडमध्ये मोठी उलथापालथ; पंकजा मुंडेंना धक्का
भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात? ‘या’ नेत्याची सागर बंगल्यावर धाव