Abhishek bachchan | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबदल दिवसेंदिवस चर्चा सुरु आहेत. प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अलीकडच्या काळात तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वी अनंत अंबानीच्या शाहीलग्न सोहळ्यात संपूर्ण बाॅलिवूड मंडळींंनी हजेरी लावली. यावेळेस बच्चन कुटुंब देखील उपस्थित होतं. दरम्यान ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत लग्नात वेगळी गेली होती.
अभिषेकने केली पोस्ट-
ऐश्वर्याचा पोन्नियन सेल्वन 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिचा हा चित्रपट अभिषेकने (Abhishek bachchan) पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेकने पोस्ट करत ऐश्वर्याचं कौतूक केलं आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एवढंच नाही तर नेटकऱ्यांच्या कमेंटवर अभिषेकने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
View this post on Instagram
काय म्हणाला अभिषेक?
अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) याच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्याने लिहिलं की, आता ऐश्वर्याला चित्रपट साईन करू द्या आणि तुम्ही मुलगी आराध्या हिच्यावर लक्ष द्या. यावर प्रत्युत्तर देत अभिषेक बच्चन म्हणाला की, तिला साईन करू देऊ? सर, तिला एखादी गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची अजिबातच गरज नाहीये. विशेषत: ज्याच्यावर ती प्रेम करते.
News Title : Abhishek bachchan on aishwarya rai permission
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे हादरलं! सासवडमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ
अभिनेत्री जान्हवी कपूरला झाली विषबाधा?, रुग्णालयात उपचार सुरू
“अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?”; योजनेसाठी काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात! 10 ते 12 डब्बे रुळावरून घसरले, मृतांचा आकडा समोर
महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer