लेकीबाबत बोलताना अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Abhishek Bachchan

Abhishek Bachchan l बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अभिषेक बच्चन हा बिग बींचा (Big B) मुलगा असला तरी त्याने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी, अनेकदा त्याची तुलना त्याचे वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी आणि पत्नी ऐश्वर्या रायसोबत (Aishwarya Rai) देखील करण्यात येते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत (Interview) अभिषेकने कुटुंबासोबत होणाऱ्या तुलनेविषयी आणि आराध्या बच्चनविषयी (Aaradhya Bachchan) एक मोठे वक्तव्य केले आहे.

तुलनेचा आता परिणाम होत नाही – अभिषेक

अभिषेक बच्चनने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला, “संपूर्ण कुटुंबाला मिळालेले यश आणि कामगिरी यांचा तुमच्यावर परिणाम होतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिषेक म्हणाला, “गेल्या २५ वर्षांपासून हे प्रश्न विचारण्यात आले आणि आता त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही.

जर तुम्ही माझी तुलना माझ्या वडिलांशी करत असाल तर तुम्ही माझी तुलना ही सगळ्यात ‘बेस्ट’ (Best) असलेल्या व्यक्तीशी करत आहात. जर तुम्ही माझी तुलना सर्वोत्कृष्ट व्यक्तीशी करत असाल तर कुठे ना कुठे मला वाटते की, या महान लोकांच्या नावांमध्ये माझे नाव घेतले जाऊ शकते यासाठी मी पात्र आहे.”

Abhishek Bachchan l कुटुंबाचा अभिमान आणि वडिलांसाठी आदर

अभिषेक पुढे म्हणाला, “मी या सगळ्याकडे अशा प्रकारे पाहतो की माझे आई-वडील (Parents), माझे आई-वडील आहेत. माझे कुटुंब, माझे कुटुंब आहे आणि माझी पत्नी ही माझी पत्नी आहे. त्यामुळे मला त्यांच्यावर किंवा त्यांच्या कामगिरीचा, त्यांनी केलेल्या कामावर खूप अभिमान आहे.”

पुढे तो वडील अमिताभ बच्चन यांच्यासाठी म्हणाला, “आम्ही इथे मुंबईत (Mumbai) एसीच्या (AC) रूममध्ये बसून कॉफी (Coffee) पितोय. तिथे ८२ वर्षांची (82 Years) व्यक्ती सकाळी ७ वाजेपासून केबीसीचे (KBC) शूटिंग (Shooting) करत आहे. हे एक आदर्श (Ideal) ठरत आहेत. मला देखील असेच बनायचे आहे. जेव्हा मी रात्री झोपायला जातो तेव्हा हाच विचार करतो आणि समजून घेतो की जेव्हा मी ८२ वर्षांचा होईन तेव्हा माझी मुलगी माझ्याविषयी हे बोलू शकते की माझे वडील ८२ व्या वर्षांचे झाले आहेत आणि ते अजूनही काम करत आहेत.”

आध्यात्मिक प्रवास आणि कुटुंबाचे महत्त्व

पुढे अभिषेक त्याच्या आध्यात्माकडील प्रवासाविषयी बोलताना म्हणाला, “आज मी जे काही आहे, ते माझ्या कुटुंबामुळे आहे. मी जे काही करतो, ते कुटुंबासाठी करतो. त्यांचे मत माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. मला माझ्या नावावर गर्व (Proud) आहे, हे नाव मला माझ्या आजोबांनी (Grandfather) दिले होते. पण मला त्या आडनावावर (Surname) जास्त गर्व आहे, जे त्यांनी आम्हाला दिले आहे आणि आशीर्वादासोबत (Blessings) आमच्यासोबत आहे. आजोबांमुळे आम्हाला प्रेम मिळाले आहे, ते पुढे तसेच मिळत राहण्यासाठी मी काम करणार. मला आशा आहे की माझी लेक आणि येणारी पिढी या सगळ्याचा सन्मान (Respect) करतील आणि त्यांचे देखील हेच विचार असतील.”

News Title : Abhishek Bachchan opens up about comparisons with family, says ‘proud of my surname’

महत्वाच्या बातम्या- 

चार्जिंगची कटकट नाही, सौरऊर्जेवर चालणार इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण माहिती

सोने घरात

ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका

मुलांमध्ये ‘या’ 3 सवयी असतील तर वेड्यासारखं प्रेम करतात मुली!

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .