घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ऐश्वर्याला सोडून चक्क..

Abhishek Bachchan | बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे संबंध आता टोकाला गेल्याचे म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. अशात अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) एक पोस्ट तूफान व्हायरल झाली आहे.

नुकताच अभिषेक बच्चन याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. अभिषेक बच्चन हा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पोहोचला आहे. त्याने तिथला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिषेक बच्चनची पोस्ट चर्चेत

यावेळी अभिषेक बच्चन याच्या हातामध्ये भारताचा झेंडा देखील दिसत आहे. मागे मैदान असून तिथे खूप सारे लोक दिसून येत आहेत. या फोटोसोबतच अभिषेक बच्चन याने खास कॅप्शन दिलं आहे. ‘मी भारताला इथे रिप्रिजेंट करण्यासाठी आलोय…जय हिंद…’, असं कॅप्शन अभिषेकने दिलं आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)याच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेक बच्चन याला चाहते ऐश्वर्या कुठे आहे?, असे सवाल करत आहेत. एकाने या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, अभिषेक ऐश्वर्या कुठे आहे? दुसऱ्याने लिहिले की, अभिषेक तू ऐश्वर्या आणि आराध्या यांना घेऊन का गेला नाहीस पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. तिसऱ्याने लिहिले की, ऐश्वर्या कदाचित अभिषेकसोबत असावी. मात्र, त्याने ऐश्वर्यासोबतचा फोटो शेअर केला नसावा. अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आता उमटत आहेत.

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्याला कुटुंबापासून वेगळं पाहिल्या गेलं आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नात देखील ऐश्वर्या लेकीसोबत वेगळ्या गाडीत आली होती. तर, नुकतीच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली होती.तेव्हा विमानतळावर ऐश्वर्या हीला मुलगी आराध्या सोबत स्पॉट केलं गेलं. तेव्हा अभिषेक तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे ते वेगळे झाल्याच्या चर्चेला अजूनच हवा मिळाली. पण, पाहायला गेलं तर अद्याप यावर बच्चन कुटुंबियांकडून अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाहीये.

ऐश्वर्या हीने अभिषेकसोबत (Abhishek Bachchan) 2007 साली संसार थाटला. विशेष म्हणजे यांचा विवाहसोहळा अत्यंत खास राहिला. पण, अभिषेकसोबत लग्न करण्याअगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि सलमान खान दोघेही लग्न करण्याच्या तयारीत देखील होते. पण, काही करणाने त्यांच्यात भांडण झाले. नंतर ऐश्वर्याचे (Aishwarya Rai) नाव हे विवेक ओबेरॉयसोबत देखील जोडले गेले. पण, तिने आयुष्याचा साथीदार म्हणून अभिषेक सोबत लग्न केले. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत.

News Title – Abhishek Bachchan shared a special photo

महत्त्वाच्या बातम्या-

Animal चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘तो’ डिलीटेड सीन तूफान व्हायरल!

ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

“विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सतर्क! आज राज्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

“खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून..”; संजय राऊतांचा हल्लाबोल