Abhishek Bachchan | बाॅलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची ओळख आहे. अनेक कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्रित दिसत असतात. सोशल मीडियावर या दोघांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांंना उधाण आलं होतं. मात्र यावर दोघांनी भाष्य केलं नव्हतं. दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये अभिषेकने घटस्फोटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यामध्ये अभिषेक म्हणाला की, मी आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेली काही वर्षे आराध्यासाठी फार कठीण होती. पण आज मी इथे ऐश्वर्याला घटस्फोट देण्यामागचं कारण स्पष्ट करणार आहे.
व्हायरल व्हिडीओ-
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये अभिषेक (Abhishek Bachchan) ऐश्वर्याबदल बोलत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल केलं होतं. मात्र, काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ खरा नसून डीपफेक असल्याचं म्हटलं आहे. कारण यात अभिषेक जे बोलतोय ते त्याच्या ओठांच्या हालचालींशी मिळतं जुळतं नसल्याने हा व्हिडीओ डीपफेक असल्याचं म्हटलं जातंय.
व्हिडीओवर टीका-
एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा अन्य ऑनलाइन टूल वापरून अभिषेकच्या जुन्या व्हिडीओवर खोटा ऑडिओ लावून तो व्हायरल केल्याचं कळतंय. त्यावरून अनेकांनी टीकासुद्धा केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याबद्दल असे बनावट व्हिडीओ बनवू नका, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
News Title : Abhishek bachchan talks about divorce
महत्त्वाच्या बातम्या-
सिद्धार्थ मल्होत्राचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सर्वांसमोर केलं असं काही की…
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ साठी मंत्री अदिती तटकरे मैदानात, पुण्यात जंगी कार्यक्रम
‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा
राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!