मनोरंजन

अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह, अमिताभ बच्चन यांनी मानले देवाचे आभार

मुंबई | अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली आहे. नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बच्चन कुटुंबातील सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दुपारी माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी कोरोनाला हरवेन हे तुम्हाला आधीच सांगितले होते. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे धन्यवाद. तसेच नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांचाही मी सदैव ऋणी आहे, असं ट्विट अभिषेक बच्चन यांनी केलं आहे.

29 दिवसांनंतर अभिषेक बच्चनला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अभिषेकची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत देवाचे आभार मानले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्याआधी अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली होती.

महत्वाच्या बातम्या-

इंदुरीकर प्रकरणात न्यायालयाने निभावली महत्त्वाची भूमिका…

कहाँ गये वो 20 लाख करोड?, पाच दिवसीय आंदोलनातून युवक काँग्रेस मागणार हिशोब

जुन्रर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचं कोरोनाने निधन

90 वर्षीय कोरोनाग्रस्त आजीला जंगलात सोडून निर्दयी नातेवाईक फरार

पंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जलद गतीने सुरू करा, अजितदादांचे निर्देश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या