बाॅलीवुड अभिनेता अभिषेक बच्चनने दिली गुडन्यूज!

मुंबई | अभिषेक बच्चनने आपल्‍या चाहत्यांसाठी खुशखबर दिली आहे. तो लवकरच ‘मनमर्जिया’ या चित्रपटातून चाहत्‍यांच्‍या भेटीला येणार आहे. 

अभिषेकने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून त्‍याने आगामी चित्रपट ‘मनमर्जिया’साठी सज्‍ज  असल्‍याचे सांगितले.  या चित्रपटाचे दिग्‍दर्शक अनुराग कश्यप असून चित्रपटाची निर्मिती आनंद राय करणार आहे.

अभिषेकसोबत तापसी पन्‍नू आणि विकी कौशल देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत.  आता तो लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.  ‘मनमर्जिया’ची कथा काय आहे, हे अद्‍याप समजलेलं नाही.