‘या’ अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला फसवलं?, खळबळजनक माहिती समोर

Aishwarya Rai | गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे वेगळे झाले असून लवकरच घटस्फोट घेणार अशा आशयाचा बातम्या पुन्हा जोर धरत आहेत.

सोशल मीडियावर अभिषेकचं घटस्फोटासंदर्भातील एका पोस्टला लाइक करणे, त्यामुळे चाहत्यांना भुवया उंचावल्यात. पण आता Reddit वर एक पोस्ट व्हायरल होतय, ज्यात ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होण्यामागे अभिषेकने ऐश्वर्याला फसवलं असं लिहिलण्यात आलंय.

अभिषेकने ऐश्वर्याला फसवलं?

एका Reddit वापरकर्त्याने हल्लीच सांगितलं की, अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्यात अंतर निर्माण झालंय. इतकंच नाही तर त्यात जे काही लिहिलं आहे त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या Reddit वापरकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘ऐश आणि अभिषेक हे बऱ्याच काळापासून वेगळे आहेत आणि याचं कारण म्हणजे अभिषेकने आपल्या पत्नीची फसवणूक केली आहे.

‘या’ अभिनेत्रीमुळे वाद

अभिषेक बच्चनचा दसवी हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेत्री निम्रत कौर त्याची सहअभिनेत्री होती. तेव्हा अभिषेक आणि निम्रत कौर रिलेशनमध्ये होते. त्यामुळं अभिषेकनं ऐश्वर्याला दगा दिला. आता ऐश्वर्या अनेक महिन्यांपासून वेगळी राहत आहे. लवकरच हे कपल घटस्फोट जाहीर करतील, असा दावाही या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलाय.

अनेक युजर्सचं असं म्हणणं आहे की तिच्यामुळेच अभिषेकने ऐश्वर्याची फसवणूक केली आणि आता दोघेही एकाच घरात रहात नाहीत. या ट्रोलिंगमुळे गेल्या अनेक दिवसांपासून निमरत कौरही चर्चेत आहे.

तर व्हायरल पोस्टच्या दाव्यात काहीच तथ्य वाटत नसल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या अफवा असतील असंही काही जणांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवारांना धक्क्यावर धक्के; आधी 600 आता तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा?

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

विधानसभेपूर्वीच राज्यात राजकीय स्फोट?, बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रुफ कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?