बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिषेक मनु सिंघवी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा; पाहा सिंघवी काय म्हणालेत…

नवी दिल्ली |  काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. खुद्द सिंघवी यांनीच खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या या केवळ अफवा आहेत. या अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी काँग्रेस सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझ्याबद्दल गॉसिप सुरू आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते हैं… जहां हमारे नाम से आग लग जाती है…’ असं त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर आणखी एका ट्विटमध्ये ‘अफवाह थी कि मैं बीमार हूं, लोगों ने पूछ पूछ कर बीमार कर दिया’ असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीदेखील सिंघवी काँग्रेस सोडणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता सिंघवी यांनी स्वत: केलेल्या खुलाश्याने होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More