बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल

मुंबई  | कोरोना वायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत.  काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच
रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. दुकानांच्या वेळा ठरवणार- शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी आणि दुपारी सुरू होतील.

बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. अशा प्रकारचे पाच बदल ठाकरे सरकारने केले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणं अनिवार्य करा- मुरलीधर मोहोळ

पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे दीड लाख मास्क वाटप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती

महत्वाच्या बातम्या-

कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव; दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा

खासदार डाॅ. अमोल कोल्हेंनी सांगितला कोरोनापासून वाचण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More