Top News महाराष्ट्र मुंबई

‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!

Photo Credit- Facebook/ Vasantrao Naik Government Medical College

मुंबई | राज्यभर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने या प्रकरणाची दखल घेत विरोधी पक्षानेही हे प्रकरणा लावून धरलं आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येला आठवडा उलटून गेला तरी संजय राठोड यांनी पुढे येऊन आपली प्रतिक्रया दिली नाही. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र अशातच या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण?, पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध?, पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का?, अशा अनेक प्रकारचे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणामध्ये अरूण राठोड नावाच्या तरूणांच नाव येत आहे. जो की कथित मंत्र्यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये पूजा राठोड नावाच्या तरूणीसोबत जो अरूण राठोड होता. तो अरूण एकच आहे की दोन्ही अरूण वेगवेगळे आहेत, असाही सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये पूजा अरूण राठोड नावाची महिला आहे. तिचा 6 तारखेला गर्भपात झाला. यामध्ये त्यामध्ये महिलेने  शिवाजीनगर, नांदेड असा पत्ता टाकला आहे. जर पेपरवरील पत्याप्रमाणे महिला नांदेडमधील शिवाजीनगरची असेल तर ती नांदेड आणि औरंगाबादला न जाता विदर्भात का आली, असे अनेक सवाल आता उपस्थित झाले असून पोलीस तपास चालू आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! चालू मिटींगमध्ये बायकोला आवरला नाही नवऱ्याला किस करण्याचा मोह अन…; पाहा व्हिडीओ

शिवजयंती निमित्त खासदार अमोल कोल्हेंनी केला नवा संकल्प!

‘तु बोलतो किती, तुझी औकात किती….’; अमोल मिटकरींची पडळकरांवर बोचरी टीका

संजय राठोडांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या