महाराष्ट्र मुंबई

शिवानी सुर्वे का संतापते??? तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलं कारण…

मुंबई | बिग बॉसच्या घरातील स्पर्धक शिवानी सुर्वे आजारी असल्यामुळे तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी तिचं तिच्या बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेसोबत फोनवर बोलणं झालं. या पार्श्वभूमीवर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने अजिंक्यशी बातचीत केली.

शिवानी सध्या मानसिकरित्या ढासळली आहे. तिला बिग बॉसच्या घरात राहणं कठीण जातंय, असं तिने फोनवर सांगितलं आहे. पण मला खात्री आहे ती या सर्व परिस्थितीतून बाहेर पडेल आणि बिग बॉसच्या घरात परत पुनरागमन करेल, असं अजिंक्य म्हणाला आहे.

शिवानीच्या संतापाबद्दल बोललं जातंय पण ती अतिशय प्रेमळ आणि आत्मविश्वासू आहे. तिनं स्वत:च्या हिमतीवर स्वत:च करिअर घडवलंय. तिने आयुष्यातला कठीण काळ पाहिलाय त्यामुळे ती लगेच हळवी होते, असंही अजिंक्यने म्हटलं आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात शिवानी आणि बिचुकले यांची केमेस्ट्री बघायला मला आवडतं, असंही अजिंक्य म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-विखेंना शह; काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

-हे शंकरा पाव रे…! आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’ आमदाराच्या समर्थकांचं देवाला साकडं

-शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

-भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

-तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या