Top News

प्रिया दत्त, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांचं काय होणार?? वाचा ‘एबीपी माझा’च्या पोलचं भाकित

मुंबई |  लोकसभेचे सगळे टप्पे पार पडलेत. आता निकालाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. परंतू त्याआधी विविध संस्थांनी आपापले एक्सिट पोलचे कल जाहीर केले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून हायव्होल्टेज लढतींपैकी मानल्या जाणाऱ्या बारामती, मावळ आणि उत्तर मध्य मुंबई या जागांवर अनुक्रमे सुप्रिया सुळे, पार्थ पवार तर उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर प्रिया दत्त बाजी मारतील, असा अंदाज एबीपी माझाच्या सर्व्हेने व्यक्त केला आहे.

भाजपच्या कांचन कुल, पूनम महाजन तर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना पराभवाचं तोंड पाहायला लागेल, असा अंदाज या सर्व्हेने वर्तविला आहे.

दुसरीकडे कांचन कुल, पूनम महाजन आणि शिवसेनेच्या श्रीरंग बारणे या तिघांनीही आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास  व्यक्त केला आहे.

दरम्यान, बहुतांशी एक्सिट पोल्सने देशात भाजपला बहुमत मिळेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-उर्मिला मातोंडकर की गोपाळ शेट्टी?? वाचा ‘एबीपी’च्या पोलचा अंदाज

-एक्झिट पोलचे कल आले… संघ-भाजपच्या भेटीगाटी सुरु झाल्या!

-देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

-भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

-विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या