राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला होणारा शिवसेनेचा विरोध निरर्थक- मुख्यमंत्री

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला होणारा शिवसेनेचा विरोध निरर्थक- मुख्यमंत्री

मुंबई | नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला असलेला शिवसेनेचा विरोध निरर्थक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नसल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. आम्ही योग्यरितीने संवाद साधतो, आम्हाला मध्यस्थांची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर चिठ्ठी घेऊन अल्टिमेटम देतात, अशा बातम्या कशा पसरतात माहिती नाही, माझ्यावर एवढी वाईट वेळ आलेली नाही, असं बोलून शिवसेनेच्या अल्टिमेटवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Google+ Linkedin