बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई | एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खळबळजनक आरोप करणारे नवाब मलिक सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्या टीमसह एका क्रुझवर कारवाई केली होती. या कारवाईत बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ एक खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांवर वानखेडे कुटुंबाकडून अगोदरच मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला गेला आहे.

आता यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. माध्यामांमध्ये चुकीच्या पोस्ट टाकून बदनाम केल्याचा कट रचल्याचा आरोप यास्मिन यांनी मलिक यांच्यावर केला आहे. याप्रकरणी आपण अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे, अशी माहिती यास्मिन वानखेडे यांनी दिली आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. परिणामी आता ते याच विभागात राहातात की कोणत्या विभागात जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

पंतप्रधान मोदींनी सहकाराला जगवण्याचं काम केलं- देवेंद्र फडणवीस

“रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झालीये”

“दोन एकर विकून पोराला शिकवलं पण पोराचा संयम ढासळला”

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More