बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र, मग हिजाब परिधान करण्याचं का नाही?”

मुंबई | नुकतंच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने विवस्त्र (Nude) फोटोशूट केले आहे. पेपर मॅगझिनसाठी (Paper Magazine) त्याने हे विवस्त्र फोटोशूट केले आहे. त्यामुळे तो नुकताच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता यावर समाजवादी पक्षाचे (Samajavadi Party) नेते आणि आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी भाष्य करत त्याच्यावर टीका केली आहे.

त्यांनी या फोटोवरुन बॉलिवूडवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. नागड्या शरीराचे प्रदर्शन घडवणं एकीकडे कला आणि स्वतंत्र म्हटलं जात आहे तर दुसरीकडे मुली आणि स्त्रीया स्वत:च्या परवानगीने आणि संमतीने आपले शरीर, हिजाब आणि बुरख्याने झाकत असतील तर त्याला धार्मिक रंग दिला जातो. त्याचा राग आणि राजकारण केले जातं, असं आझमी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

रणवीर सिंग याने पेपर मॅगझिनसाठी हे फोटो काढले होते. त्याचे हे फोटो पेपर मॅगझिनने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकले होते. आता रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला असून तो वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपू्र्वी कर्नाटकातील शाळेत आणि महाविद्यालयात मुलींना हिजाब घालून येण्यावर बंदी करण्यात आली होती. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं आणि देशात आणि महाराष्ट्रात कर्नाटक राज्य सरकारच्या या कामावर टीका केली जात होती. त्यात समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर होते.

थोडक्यात बातम्या –

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल!

‘बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच’; संजय राऊत आक्रमक

राज्याला पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More