Top News महाराष्ट्र

महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबू आझमी

मुंबई | महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार खूप वाढले आहेत. दिवसेंदिवस अनेक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. अशात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे.

देशाचा कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय आहे? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यात कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहतील आणि नंतर सांगतील माझा बलात्कार झाला, असं अबू आझमी म्हणाले.

इस्लामी कायदा आहे. एखाद्या महिलेचं जर लग्न झालं नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येतं, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे. खरं तर प्रत्येक धर्मात हेच आहे. मात्र आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत, असं अबू आझमींनी म्हटलंय.

मी एकदा यूपीला गेलो होतो. तिथे एक महिला भरदुपारी डोक्यावर शेण घेऊन चालली होती, तरी तिने डोक्यावर पूर्ण पदर घेतला होता, ही आपली संस्कृती आहे, असं अबू आझमींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या