मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांची चौकशी होणं गरजेचं आहे. पण चौकशी होण्याआधीच त्यांना दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. तर तुम्ही एका महिलेला पुरूषासोबत. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता. कुठलाही गुन्हा, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला, असं अबू आझमी म्हणालेत.
मी एकदा यूपीला गेलो होतो. तिथे एक महिला भरदुपारी डोक्यावर शेण घेऊन चालली होती, तरी तिने डोक्यावर पूर्ण पदर घेतला होता, ही आपली संस्कृती आहे, असं अबू आझमींनी सांगितलं.
मी एकदा यूपीला गेलो होतो. तिथे एक महिला भरदुपारी डोक्यावर शेण घेऊन चालली होती, तरी तिने डोक्यावर पूर्ण पदर घेतला होता, ही आपली संस्कृती आहे. पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ
फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!
…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार
शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर सावधान!
एकाच गावातील तरुण-तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ; पाहा काय आहे प्रकरण